Home eLearningAssistant NewDigitalMarathi ScholarshipVideos G.K. Quizzes Grammar PhotoGallery

Responsive Topnav with Dropdown

Saturday, 3 June 2023

Things to do after Class 10 Result 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

विषय : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी ) परीक्षा मार्च २०२३ चा निकाल

मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात आला आहे. 

निकालानंतरच्या पुढील कार्यवाहीसाठी खाली महत्त्वाची माहिती व वेबसाईट्स च्या लिंक्स दिलेल्या आहेत. 

खालील पैकी कोणत्याही वेबसाईट वरून गुणपत्रिका डाउनलोड करता येईल. 

www.mahresult.nic.in 


http://sscresult.mkcl.org 


https://ssc.mahresults.org.in 


https://hindi.news18.com/news/career/board-results maharashtra-board 


 
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023


http://mh10.abpmajha.comwww.mahresult.nic.in 


या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. 

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 


सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे- 

१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 


गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते सोमवार, दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत व 

छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरुवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. 

त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल. 

२) मार्च २०२३ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

३) मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजने अंतर्गत उपलब्ध राहतील. 

४) जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ०७/०६/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. 

५) मार्च २०२३ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत बुधवार दि. १४/०६/ २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

सचिव, राज्य मंडळ, पुणे ०४.

No comments:

Post a Comment

Please give your valuable opinion regarding the post.

Class 10 Result 2024 Link 7 / Maharashtra SSC Result 2024

[Class 10 Result 2024 / Maharashtra SSC Result 2024] इयत्ता 10 वी 2024 परीक्षेच्या च्या निकालाची लिंक . ...

------------------ ----------------------------------